CJP – Congress Yuti : काँग्रेस कॉकरोच जनता पार्टीसोबत करणार युती? ‘या’ नेत्याच्या ट्विटची राजकीय वर्तुळात चर्चा
तरुणाईमधील प्रचंड क्रेझ आणि वाढती लोकप्रियता यामुळे (CJP - Congress Yuti) या डिजिटल आंदोलनाने आता देशातील मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांचे लक्ष वेधून घेतले आहे.

CJP – Congress Yuti : सोशल मीडियावर सध्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ची तुफान चर्चा सुरू आहे. तरुणाईमधील प्रचंड क्रेझ आणि वाढती लोकप्रियता यामुळे (CJP – Congress Yuti) या डिजिटल आंदोलनाने आता देशातील मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सरकारविरोधातील असंतोष, बेरोजगारी आणि तरुणांच्या नाराजीचे एक आक्रमक प्रतीक म्हणून या ऑनलाइन चळवळीकडे पाहिले जात आहे.याच पार्श्वभूमीवर, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस सारख्या (CJP – Congress Yuti) मोठ्या राजकीय पक्षांनी या अनोख्या चळवळीला पाठिंबा दर्शवत मोठे विधान केले आहे.
“राहुल गांधींचे नेतृत्व स्वीकारा”
‘कॉकरोच जनता पार्टी’च्या वाढत्या प्रभावावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उदित राज यांनी एक अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सीजेपीला काँग्रेससोबत येण्याचे थेट आवाहन केले आहे.
उदित राज आपल्या निवेदनात म्हणाले, “कॉकरोच जनता पार्टीसारख्या डिजिटल चळवळीमध्ये प्रचंड ऊर्जा आहे. परंतु, जर या चळवळीला खऱ्या राजकीय शक्तीमध्ये रूपांतरित व्हायचे असेल, तर त्याला एका प्रस्थापित आणि अनुभवी नेतृत्वाची गरज लागेल. राहुल गांधींचे नेतृत्व या तरुणांच्या असंतोषाला आणि ऊर्जेला योग्य दिशा देऊ शकते.”
त्यांनी पुढे चेतावणीवजा इशारा देत म्हटले की, जर ही डिजिटल ऊर्जा अशीच विखुरलेली राहिली, तर तिचा राजकीय प्रभाव काळासोबत कमी होईल. त्यामुळे संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी या चळवळीने (CJP – Congress Yuti) काँग्रेससोबत येऊन एका मोठ्या आंदोलनाचे रूप घ्यावे. उदित राज यांच्या या वक्तव्यामुळे आगामी काळात काँग्रेस या नव्या डिजिटल पक्षासोबत युती करणार का, अशा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
तृणमूल काँग्रेसचाही ‘डिजिटल आवाजाला’ पाठिंबा
फक्त काँग्रेसच नाही, तर तृणमूल काँग्रेसनेही या ऑनलाइन पार्टीच्या पाठीशी उभे राहण्याचे संकेत दिले आहेत. टीएमसीचे राज्यसभा खासदार डेरेक ओ’ब्रायन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या चळवळीचे कौतुक केले आहे.
डेरेक ओ’ब्रायन यांनी स्पष्ट केले की, त्यांचा पक्ष सोशल मीडियावरील अशा डिजिटल आवाजांना अत्यंत गांभीर्याने घेतो.लोकशाहीच्या मुद्द्यांवर तरुणांचा असा सक्रिय सहभाग कौतुकास्पद असून त्याला पाठिंबा देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सूचित केले.
राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा
एक डिजिटल मीम किंवा ट्रेंड म्हणून सुरू झालेली ‘कॉकरोच जनता पार्टी’ आता देशातील बड्या नेत्यांच्या विधानांमुळे राजकीय चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू बनली आहे. तरुणाईचा हा रोष आगामी निवडणुकांमध्ये (CJP – Congress Yuti) कोणाला फायद्याचा ठरणार आणि काँग्रेस-टीएमसीसारखे विरोधक या ऊर्जेचा वापर सरकारविरोधात कसा करून घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






