मुंबईत पाच कोटींचे कोकेन जप्त
Updated On:

मुंबई – एक किलो कोकेनसह 45 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले. आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत पावणेपाच कोटी रुपये आहे.
आरोपीविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचे पथक डोंगरी परिसरात गस्त घालत असताना एक संशयित दुचाकीस्वार त्यांना पाहून पळू लागला.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन दुचाकीची तपासणी केली असता त्यात पांढऱ्या रंगाचा पदार्थ सापडला. तपासणीत ते कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी आरोपीची चौकशी सुरू आहे.





