CNG Price Pune: उद्यापासून सीएनजी 4 रुपयांनी स्वस्त
Updated On:

पुणे – “महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड’ (एमएनजीएल) ने पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि तळेगाव, चाकण, हिंजवडी या लगतच्या भागात सीनजीच्या किंमती 4 रुपयांनी कमी केल्या आहेत. दि. 17 ऑगस्टपासून नवे दर लागू होणार आहेत. त्यामुळे नवे भाव आता साधारणपणे 87 रुपये प्रतिकिलो असतील.
पुणे स्थित सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन (सीजीडी) कंपनी आणि “एमएनजीएल’ ने पिंपरीसह पुणे शहरात वाहनांच्या सेगमेंटसाठी कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस च्या किरकोळ विक्री दरात प्रति किलो 4 रुपयांची कपात केली आहे. चिंचवड आणि आजूबाजूच्या चाकण, तळेगाव आणि हिंजवडी भागात मध्यरात्रीपासून हे दर लागू होत आहेत.





