सी.एम.ओ ट्विटर अकाउंटचे नाव बदलले
Updated On:

मुंबई: महाराष्ट्रातील राजकीय नाट्याच्या शेवट झाल्यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीच सरकार स्थापन झाले आहे.
शिवसेनेच्या राजकीय कारकिर्दीचा आणि जडणघडणीत साक्षीदार असलेल्या शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ते महाराष्ट्राचे २९वे मुख्यमंत्री ठरले आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सी.एम.ओ ट्विटर अकाउंटचे नाव बदलण्यात आले आहे.






