“महाकुंभ बनला मृत्यूकुंभ’; मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाजप नेत्यांवर जोरदार हल्ला

Mamata Banerjee: – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभाबाबत विधानसभेत वक्तव्य केले आहे. सीएम बॅनर्जी म्हणाल्या की, महाकुंभाचे आता ‘मृत्युकुंभ’मध्ये रूपांतर झाले आहे. व्हीआयपी लोकांना विशेष सुविधा दिल्या जात आहेत, तर सर्वसामान्यांना तेथे त्रास होत आहे. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांवरही जोरदार हल्ला चढवला.
सीएम बॅनर्जी यांनी महाकुंभला म्हटले मृत्युकंभ –
सीएम ममता बॅनर्जी यांनी महाकुंभला मृत्युकंभ म्हटले आहे. त्या म्हणाल्या की हा ‘मृत्यू कुंभ’ आहे. मी महाकुंभाचा आदर करते, मी पवित्र माता गंगेचा आदर करते. पण कोणतेही नियोजन नाही. श्रीमंत आणि व्हीआयपींसाठी 1 लाख रुपयांपर्यंत कॅम्प (तंबू) मिळण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. कुंभमध्ये गरिबांसाठी कोणतीही व्यवस्था नाही. जत्रांमध्ये चेंगराचेंगरीची परिस्थिती सामान्य आहे, परंतु व्यवस्था करणे महत्वाचे आहे. तुम्ही काय योजना आखल्या? असा प्रश्नही त्यांनी विचारला.
Kolkata: On #MahaKumbh2025, West Bengal CM Mamata Banerjee says, “This is ‘Mrityu Kumbh’…I respect Maha Kumbh, I respect the holy Ganga Maa. But there is no planning…How many people have been recovered?…For the rich, the VIP, there are systems available to get camps (tents)… pic.twitter.com/6T0SyHAh0e
— ANI (@ANI) February 18, 2025
ममता यांनी भाजपला दिले आव्हान –
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही भाजपला आव्हान दिले आहे. बांगलादेशी कट्टरपंथीयांशी संबंध असल्याचा आरोप त्यांनी सिद्ध करावा, असे मुख्यमंत्री बॅनर्जी म्हणाल्या. हे सिद्ध करण्यात ते यशस्वी झाले तर त्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील.
आमदारांबाबत पंतप्रधानांकडे तक्रार करणार –
बांगलादेशी कट्टरपंथीयांशी संगनमत केल्याचा आरोप करणाऱ्या त्यांच्या आमदारांबद्दल मी पंतप्रधान मोदींकडे तक्रार करणार असल्याचेही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले. भाजपवर आरोप करताना त्या म्हणाल्या की, भाजप आपले राजकीय स्वार्थ साधण्यासाठी धर्माचा वापर करत आहे.
‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य द्वेष पसरवणं आणि लोकांमध्ये फूट पाडण्याची परवानगी देत नाही’ –
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की अभिव्यक्ती स्वातंत्र्य भाजप आमदारांना द्वेष पसरवणे आणि लोकांमध्ये फूट पाडण्याची परवानगी देत नाही. भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी शनिवारी राज्यातील काही भागात देशविरोधी कारवाया वाढल्याचा आरोप केला होता आणि यासाठी मुख्यमंत्री बॅनर्जी यांना जबाबदार धरले होते. राज्यातील भाजप नेते मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधत आहेत. भाजप नेते ममता बॅनर्जी यांच्यावर आरोप करत आहेत की, त्यांचे सरकार बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरित आणि रोहिंग्या स्थलांतरितांना राज्यात स्थायिक होऊ देत आहेत.





