CM Eknath Shinde on Manjoj Jaragne । आज सत्ताधारी महायुती सरकारने आपल्या कामाचा लेखाजोखा मांडणारा रिपोर्ट कार्ड जनतेसमोर सादर केले आहे. यावेळी महायुयीने पत्रकार परिषद घेत आपल्या आजपर्यंतच्या कामाची माहिती दिली. तसेच यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा तर साधलाच पण यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे यांना रोखठोक उत्तर दिले आहे. :मराठा समाजाला मी स्वत: आरक्षण देणार” CM Eknath Shinde on Manjoj Jaragne । महायुतीकडून आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी,”मी जे बोलतो ते करतो. मराठा समाजाला मी स्वत:, आम्ही आरक्षण देणार आहे. मराठ्यांना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिले जाईल, “अशी स्पष्टोक्ती दिली. यावेळी एकनाथ शिंदे यांना मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत प्रश्न विचारण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीसमोर मनोज जरांगे यांच्या रुपाने मराठा समाजाचं मोठं आव्हान असेल. त्याचा सामना कसा करणार, असे एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आले. त्यावर एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका रोखठोक शब्दांत स्पष्ट केली. पुढे बोलताना एकनाथ शिंदे यांनी,”हे बघा आम्ही जे बोलतो ते करतो. मी स्वत: मराठा समाजाला आरक्षण देणार, तेदेखील ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता. मी दसरा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करुन मराठा आरक्षण देण्याची शपथ घेतली. त्यानंतर तात्काळ विधानसभेचं अधिवेशन बोलवून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनीही मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, ते आरक्षण कोणी घालवलं, ते त्यांना कोर्टात टिकवता आले नाही. आतादेखील आम्ही आरक्षण दिले आहे, ते रद्द करण्यासाठीही आटापिटा सुरु आहे, “असे सांगत त्यांनी विरोधकांना टोला लगावला. मनोज जरांगेंना एकनाथ शिंदेंचा सल्ला CM Eknath Shinde on Manjoj Jaragne । पुढे त्यांनी,”दुसरी गोष्ट म्हणजे मराठवाड्यात कधी कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते. आम्ही जस्टीस शिंदे कमिटी स्थापन केली. इतकी वर्षे ज्यांच्या हातात संधी होती, सत्ता होती, त्यांनी कधी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. फक्त मतांसाठी मराठा समाजाचा वापर केला. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरले. पण त्यांनी हा विचार केला पाहिजे की, महायुतीने काय काय दिलं,सारथी दिलं, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ दिलं. ओबीसी समाजाप्रमाणे मराठ्यांना सवलती देण्यात आल्या. हे सगळं कोणी केलं? मराठा समाजाला कोणी वंचित ठेवलं आणि कोणी दिलं, याचा विचार मनोज जरांगे यांनी करायला पाहिजे, असा सल्ला देखील एकनाथ शिंदे यांनी दिला.