“अशा प्रकारच्या गुन्हेगारांना जरब बसेल अशी…” ; बाबा सिद्दीकी यांच्या हत्येवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

CM Eknath Shinde on Baba Siddique । अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या बातमीने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, बाबा सिद्धीकी यांच्या हत्येवर मुख्यमंत्री शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ही केस फास्टट्रॅकमध्ये घेण्यात येणार असून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
ही अत्यंत दुर्दैवी घटना – मुख्यमंत्री शिंदे CM Eknath Shinde on Baba Siddique ।
मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की,बाबा सिद्दीकी यांच्यावर ज्यांनी हल्ला केला त्यांच्या तात्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यामध्ये एक हरियाणा आणि एक उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती आहे. एका आरोपीच्या मागावर पोलीस सध्या आहेत. त्यालाही लवकरच अटक करण्यात येईल आणि कठोर कारवाई करण्यात येईल. कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाही नाही. मुंबई पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सक्षम आहेत. ही केसही आपण फास्टट्रॅकवर घेण्याची मागणी करु.अशा प्रकारच्या गुन्हेगारांना जरब बसेल अशी कारवाई करण्यात येईल. ही अत्यंत दुर्दैवी घटना असून याचा तपास घेतला जाईल.
गोळीबारात बाबा सिद्धीकी यांचा मृत्यू CM Eknath Shinde on Baba Siddique ।
अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर काल रात्री झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयासमोरच गोळीबार करण्यात आला आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर एकूण सहा गोळ्या फायर करण्यात आल्या होत्या. त्यातील तीन गोळ्या बाबा सिद्दीकी यांना लागल्या त्यात त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. यातील दोन आरोपींना पोलिसांना ताब्यात घेतलं असून यातील एक शूटर हा हरियाणा आणि एक शूटर हा उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या आरोपीच्या मागावर पोलीस सध्या असल्याची माहितीही मुख्यमंत्री शिंदेंकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा
लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले,’पोस्टमार्टमवेळी व्हिडिओग्राफीही करण्यात आली…’





