लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले,’पोस्टमार्टमवेळी व्हिडिओग्राफीही करण्यात आली…’

Baba Siddique Shot Dead । राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. काल रात्री मुंबईतील वांद्रे येथे त्यांची हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांना अगदी जवळून सार्वजनिक ठिकाणी गोळ्या घालण्यात आल्या. त्यानंतर लगेचच बाबा सिद्दीकी यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
बाबा सिद्दीकी यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कूपर रुग्णालयात आणण्यात आला आहे. सकाळी ७.०० वाजता मृतदेहाचे पोस्टमॉर्टम सुरू झाले, त्याची व्हिडिओग्राफीही केली जाईल.
#WATCH | Baba Siddique firing | Dr Jalil Parkar, Lilavati Hospital says, “Around 9:30 pm Baba Siddique was brought here. When he was taken into the emergency his pulse or BP was not recordable. The ECG was a flat line…We shifted him to the ICU. He was declared dead around 11:25… pic.twitter.com/JYMtJvB2qf
— ANI (@ANI) October 12, 2024
असे म्हटले जात आहे की, आरोपीने अगदी जवळून गोळ्या झाडल्या. बाबा आणि त्यांचा मुलगा झीशान कार्यालयातून बाहेर पडत असताना हल्लेखोरांनी गोळीबार केला. हल्ल्यानंतर त्यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे कोणाचा हात आहे, याचा वेगाने तपास सुरू असतांना पोलिसांकडून मोठी या अपडेट समोर येत आहे.
मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या मोठ्या माहितीनुसार, गुन्हे शाखेने असा दावा केला आहे की, चौकशीदरम्यान आरोपींनी लॉरेन्स बिश्नोईशी आपले संबंध उघड केले आहेत.
आरोपी गेल्या 25-30 दिवसांपासून त्या भागात रेकी करत होते. तिन्ही आरोपी ऑटो रिक्षाने वांद्रे पूर्व शूटिंग स्थळी (जिथे गोळी झाडली होती) आले होते. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यापूर्वी तिघेही काही वेळ तेथे थांबले होते.
आरोपींना आणखी कोणीतरी माहिती पुरवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. करनैल सिंग हा हरियाणाचा रहिवासी असून धर्मराज कश्यप हा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे, अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.





