CM Devendra Fadnavis live : लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं गिफ्ट; केली ‘ही’ सर्वात मोठी घोषणा…
राज्यातील लाडकी बहीण योजना ही अतिशय लोकप्रिय योजनांपैकी एक योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे.
CM Devendra Fadnavis live : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा या वर्षाचा अर्थसंकल्प शुक्रवार दिनांक 6 मार्च रोजी विधानसभेत सादर करत आहेत. राज्याचा अर्थसंकल्प सादर करणारे पहिलेच मुख्यमंत्री हा विक्रम देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर या निमित्ताने जमा होणार आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी समिती स्थापन केली आहे.
३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्ज माफी योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेनुसार आता ज्या शेतकऱ्यांचं दोन लाखांपर्यंतच कर्ज थकीत आहे, त्यांना आता कर्जमाफी मिळणार आहे.
तसेच, राज्यातील लाडकी बहीण योजना ही अतिशय लोकप्रिय योजनांपैकी एक योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. आज सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी देण्यात आली.
ही योजना अशीच सुरु राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अशीच सुरु राहणार असून, भरीव तरतूद केली जाईल अशी घोषणा करण्यात आली आहे.






