Digital Arrest : ‘डिजिटल अरेस्ट नावाची कोणतीही गोष्ट नाही; भीतीला बळी पडू नका’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन!
Digital Arrest : कायद्यात 'डिजिटल अरेस्ट' नावाची कोणतीही संकल्पना किंवा प्रक्रिया अस्तित्वात नाही.

Digital Arrest : डिजिटल अरेस्ट नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही आणि पोलीस किंवा सीबीआय अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या व्यक्तीने व्हिडिओ कॉल केल्यास लोकांनी घाबरून जाऊ नये, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. (Digital Arrest)
सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये त्वरित १९३० या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, कारण गमावलेली रक्कम परत मिळवणे, हे ती घटना किती लवकर कळवली जाते यावर अवलंबून असते, असे ते म्हणाले. (Digital Arrest)
फडणवीस यांनी राज्य पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात डिजिटल अरेस्ट या विषयावरील सायबर जनजागृती करणारी लघुपट आणि १९३० महाराष्ट्र सायबर अँथमचे (गीत) अनावरण केले. (Digital Arrest)
फडणवीस म्हणाले, सायबर फसवणूक झाल्यानंतरचा लगेचचा काळ, ज्याला गोल्डन अवर (महत्त्वाचा काळ) म्हटले जाते, तो पैसे परत मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. जर या काळात तक्रार केली गेली, तर पैसे दुसऱ्या खात्यात हस्तांतरित होण्यापासून किंवा काढले जाण्यापासून रोखण्याची किंवा ते परत मिळवण्याची शक्यता अधिक असते. (Digital Arrest)
उशीर झाल्यास पैसे परत मिळवणे अत्यंत कठीण होते कारण ते अनेक बँक खात्यांमधून हस्तांतरित केले जातात. सायबर गुन्हेगार विविध पद्धतींचा वापर करतात, ज्यामध्ये पार्सलमध्ये अमली पदार्थ सापडल्याचा दावा करणे, ओटीपी फसवणूक, तसेच पोलीस किंवा सीबीआयच्या नावाने बनावट फोन कॉल आणि धमक्या देणे यांचा समावेश असतो. (Digital Arrest)
व्हिडिओ कॉलवर पोलीस गणवेशातील व्यक्ती किंवा पोलीस अधिकारी अथवा न्यायाधीश असल्याचे भासवणाऱ्या व्यक्तीला पाहून लोक अनेकदा घाबरतात. नागरिकांनी अशा दबावाला किंवा भीतीला बळी पडू नये. तंत्रज्ञानामुळे मोबाईल फोन, ऑनलाइन व्यवहार, पेमेंट गेटवेज आणि इतर डिजिटल सेवा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत, परंतु यामुळे सायबर गुन्ह्यांचा धोकाही वाढला आहे. (Digital Arrest)
सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती हा सर्वात प्रभावी मार्ग असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच, अभिनेते, गायक आणि इतर कलाकार हा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यास मदत करू शकतात, असे सांगत त्यांनी ४२ मिनिटांच्या डिजिटल अरेस्ट या चित्रफितीतील क्लिप्स आणि रील्सचा वापर करून सोशल मीडियावर व्यापक मोहीम राबवण्याचे आवाहन केले. तसेच, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे निर्माण होणारी आव्हाने याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधले. (Digital Arrest)
Digital Arrest Case : डिजिटल अरेस्टच्या भीतीने ज्येष्ठाची 10 कोटींची फसवणूक; आरोपीला अखेर जामीन






