Devendra Fadnavis : ‘गोकुळच्या बाबतीत मी कायदा आणि संस्थेच्या मागे’; फडणवीसांनी सांगितलं राजकारण
Devendra Fadnavis : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या अत्यंत चुरशीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेर महायुतीचे राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे.

Devendra Fadnavis : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक अखेर पार पडली असून महायुतीचे राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडणुकीवरून सुरू असलेल्या राजकीय वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली. (Devendra Fadnavis)
“गोकुळच्या संदर्भात मी कायदा आणि संस्थेच्या मागे आहे. या प्रकरणात वैधानिक पेच निर्माण झाला होता,” असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. (Devendra Fadnavis)
वैधानिक पेचामुळे शासननियुक्त संचालकांची नियुक्ती
फडणवीस म्हणाले की, गोकुळमध्ये एका गटाचे १३, तर दुसऱ्या गटाचे १२ संचालक होते. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आवश्यक कोरम पूर्ण होत नव्हता. सरकारला हवे असते तर निवडणुकीनंतर लगेच शासननियुक्त संचालक पाठवता आले असते; मात्र संबंधित परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेण्यात आला. (Devendra Fadnavis)
उच्च न्यायालयाने अध्यादेशात त्रुटी नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच चार शासननियुक्त संचालकांची मते वेगळी ठेवून निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते, असेही फडणवीस यांनी सांगितले. सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी एकत्रित निर्णय घेतला असता, तर शासननियुक्त संचालक पाठवण्याची वेळ आली नसती, असेही ते म्हणाले. (Devendra Fadnavis)
‘गोकुळच्या निवडणुकीला राजकीय रंग दिला’
गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला राजकीय रंग दिल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. या प्रकरणात राहुल गांधी यांनीही लक्ष घातल्याचा उल्लेख करत त्यांनी विरोधकांवर टीका केली. सहकार क्षेत्राचा अनुभव असलेल्या व्यक्तींनाच गोकुळमध्ये संचालक म्हणून नियुक्त केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Devendra Fadnavis)
शासननियुक्त संचालकांमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञाचा समावेश असल्यावरून होणाऱ्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. “एक गायनॅकॉलॉजिस्ट असेल तर त्यात चूक काय? देशाच्या विरोधी पक्षनेत्याला जर या विषयात लक्ष घालावे लागत असेल, तर गायनॅकॉलॉजिस्ट तर सामान्य व्यक्ती आहे,” असा टोला त्यांनी लगावला. (Devendra Fadnavis)
राहुल गांधींवर ‘अल्ट्रा लेफ्टिस्ट’ म्हणत टीका
राहुल गांधी यांच्या आंदोलनावरही फडणवीस यांनी जोरदार टीका केली. काँग्रेसकडून सर्वोच्च न्यायालय, रिझर्व्ह बँक आणि अन्य घटनात्मक संस्थांबाबत अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. (Devendra Fadnavis)
“राहुल गांधी संविधानाने तयार केलेल्या संस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. या संस्था दबावाखाली असल्याचे सांगून जनतेमध्ये अविश्वास निर्माण केला जात आहे,” असे फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis)
राहुल गांधी नेपाळमध्ये निर्माण झालेल्या व्यवस्थेसारखी परिस्थिती भारतात आणू इच्छित असल्याचा दावाही त्यांनी केला. भाजपच्या ‘लोकशाही बचाव’ आंदोलनाचे समर्थन करत विरोधकांच्या भूमिकेला रस्त्यावर उतरून उत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, “दिमागी नक्षलवाद्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल,” अशी आक्रमक टिप्पणीही त्यांनी केली. (Devendra Fadnavis)
गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर आता या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले असून फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. (Devendra Fadnavis)



