सलग चौथ्या दिवशी ढगाळ वातावरण
Updated On:

पिंपरी -पिंपरी-चिंचवड शहरात सलग चौथ्या दिवशी ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना दिवसभर उकाडा सहन करावा लागला.
थंडी जाऊन उन्हाळ्याची चाहून लागत असतानाच गेल्या काही दिवसांपासून अचानकच वातावरणात बदल होऊ लागले आहेत.
दोन दिवसांपूर्वी शहरातील काही भागांमध्ये तुरळक पाऊस पडला होता. तर बुधवारी मावळ परिसरात काही भागांमध्ये पाऊस झाला. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे शेतकरी, वीट भट्टी व्यावसायिक यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे पिंकांना नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.





