Pimpri : आठवडाभर ढगाळ वातावरणासह धुक्याचा अंदाज
Updated On:

पिंपरी : गेली दोन दिवसांपासून पडणार्या धुक्यामुळे उद्यगनगरीतून थंडी गायब झाली असून, पुढील आठवडाभर शहराचे वातावरण ढगाळ राहण्याबरोबरच धुके पडण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.
गेली दोन दिवसांपासून शहर व परिसरात दाट धुके पडत आहे. शुक्रवारी (दि.20) रात्रीपासून शहराच्या विविध भागांत धुके पडले होते. तेव्हापासून दररोज शहरात धुके पडत असून, थंडीची तीव्रता कमी झाल्याचा वातावरणातील बदल दिसून आला आहे.
रविवारी सकाळपर्यंत शहरातील चिंचवडचे किमान तापमान 18.4 अंश सेल्सिअस तर दापोडीतील तापमान 18.2 एवढे नोंदविण्यात आले. तर लोणावळ्यात किमान14.0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.





