पुणे जिल्हा | उंडवडी सुपे येथील पालखीतळाची स्वच्छता

सुपे, (वार्ताहर)– विद्या प्रतिष्ठानचे सुपे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित स्वच्छवारी-स्वस्थ वारी, निर्मल वारी- हरित वारी या उपक्रमांतर्गत जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या उंडवडी सुपे येथील पालखी मुक्कामाच्या ठिकाणची स्वच्छता केली.
यावेळी विद्यार्थ्यांनी रिकाम्या पाणी बॉटल, पत्रावळी, प्लॅस्टिक कचरा, निर्माल्य आदींचे संकलन करून स्वछता करण्यास उंडवडी सुपे ग्रामपंचायत व बारामती पंचायत समितीला सहकार्य केले. संकलित कचऱ्याची प्रशासनामार्फत विल्हेवाट लावण्यात आली.
उपक्रमासाठी गटविकास अधिकारी अनिल बागल, विस्तार अधिकारी श्रीकांत दणाने, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. दत्तात्रय शिंदे, उंडवडी सुपेच्या सरपंच शोभा कांबळे, उपसरपंच अनिल गवळी, ग्रामविस्तार अधिकारी विनोद आटोळे, सर्वं ग्रामपंचायत सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
महाविद्यालयातील कार्यक्रम अधिकारी प्रा. निकिता गाडेकर, प्रा. अमोल भोसले, प्रा. दीपक कुंभार, प्रा. सिद्धार्थ लोंढे, प्रा. बसुराज कोळी, प्रा. आरती वाबळे, प्रा. प्रतिमा बंडगर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रोहित खलाटे, शेखर लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना सहकार्य केले.





