नगर | बायजाबाईदेवी मंदिर परिसराची महिलांकडून स्वच्छता
Updated On:

नगर, (प्रतिनिधी)- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘एम्प्रेस बाईकर्स’ या महिलांच्या ग्रूपने नगरजवळील जेऊर येथील बायजाबाईदेवी मंदिर परिसरात स्वच्छता केली. ट्रेक्रम्प अननोन संस्थेच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘एम्प्रेस बाईकर्स’ या ग्रूपने आतापर्यंत अनेक उपक्रम राबविले आहेत.
या ग्रूपमध्ये बाईक चालविणर्या केवळ महिलाच आहेत. बाईक रॅली माध्यमातून विविध कार्यक्रम ‘एम्प्रेस बाईकर्स’ राबवित आहेत. त्याअंतर्गतच जागतिक पर्यावरण दिनी सकाळी 6 वाजता नगरमधून महिलांची बाईक रॅली जेऊरमध्ये पोहोचली.
हातमोजे घालून सर्वांनी बायजाबाई मंदिराच्या डोंगर परिसरातील कचरा गोळा करण्यास सुरुवात केली. प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्या गोळा करत एम्प्रेस बाईकर्स मंदिरापर्यंत पोहोचल्या. तेथे गोळा केलेल्या सर्व प्लॅस्टिकच्या कचर्याची विल्हेवाट योग्यरित्या लावण्यात आली.





