इयत्ता अकरावी प्रवेश: ४२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदवले पसंतीक्रम

पुणे – पुणे, पिंपरी- चिंचवड महापालिका क्षेत्रांतील इयत्ता अकरावीच्या पहिल्या नियमित प्रवेश फेरीत “कॅप’अंतर्गत पाच दिवसांत ४२ हजार ४१७ विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविले आहेत.
पहिल्या नियमित प्रवेश फेरीला ५ जूनपासून सुरुवात झाली आहे. इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ८३ हजार २८४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामधील ७६ हजार ७३४ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग -१ भरून ते लॉक ंले आहेत. ३१ हजार ४९० अर्जांची ऑनलाइन पडताळणी झालेली आहे. ३४ हजार ४१ अर्जांची मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून पडताळणी झालेली आहे.
पहिल्या नियमित प्रवेशांतर्गत अर्जाचा भाग- १ व २ भरणे, प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदविणे व ऑनलाइन सादर करणे, विद्यार्थ्यांना भाग- २ मध्ये किमान एक व कमाल १० महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविण्यासाठी १६ जून मुदत आहे. कॅप अंतर्गत महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविताना सोयीच्या महाविद्यालयांनाकडेच कल अधिक आहे. कोटा प्रवेशासाठी ५ हजार ५०८ विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम पसंतीक्रम दाखल केले आहेत.
३४३ महाविद्यालयांत १ लाख १९ हजार ८९० प्रवेशाच्या जागा उपलब्ध झालेल्या आहेत. कॅप अंतर्गत ९३ हजार ३९५ व कोटाअंतर्गत २६ हजार ४९५ प्रवेशाच्या जागा उपलब्ध आहेत.





