Pune District | तळजाई टेकडीवर दोन आमदारांची गळाभेट

इंदापूर, -इंदापूर तालुक्यातील परस्पर चांगले संबंध जोपासणारे आमदार दत्तात्रय भरणे तिसर्यांदा आमदार झाले आहेत. तालुक्यातील ऋणानुबंधाचे नाते सोडा; मात्र सर्वपक्षीय ऋणानुबंधाचे संबंध आमदार दत्तात्रय भरणे यांनी जोपासले आहेत. राजकारणाबरोबर, आरोग्यासाठी व्यायाम हे सूत्र, कायम आमदार भरणे यांनी जपल्याने, मॉर्निंग वॉक व सोबतीला सामाजिक, राजकीय, पत्रकारिता, क्षेत्रातील अनेक दिग्गज पुणे येथिल तळजाई टेकडीवर मॉर्निंग वॉक करतात. सोमवारी (दि. 2) खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांची विजयानंतर पहिलीच भेट झाली.
आमदार भरणे यांची गळाभेट घेतली. भरघोस मताने निवडून आल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. आमदार दत्तात्रय भरणे व आमदार भीमराव अण्णा तापकीर यांची गळाभेट, मॉर्निंग वॉक मधील सहकार्यांनी कॅमेर्यात टिपली. राज्याच्या राजकारणात, सलग दहा वर्षाहून अधिक कालावधी राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी घालवला असून, इंदापूर विधानसभेत तिसर्यांदा हॅट्रिक साधत केवळ आपल्या कामाच्या जोरावर, तालुक्याचे लोकप्रतिनिधी, आमदार म्हणून आमदार भरणे यशस्वी ठरले आहेत.
राजकीय पक्ष वेगवेगळे असले तरी देखील, एकमेकांबद्दल असलेले प्रेम या गळाभेटीतून जनतेसमोर आले आहे. आमदार भरणे व आमदार तापकीर यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या, आलिंगन केले.
पुणे ः येथील तळजाई टेकडीवर मॉर्निंग वॉक करताना, आमदार दत्तात्रय भरणे, आमदार भीमराव तापकीर यांची गळाभेट.





