सोनई, (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील सोनई येथे दोन गटांत हाणामारी होऊन पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दि. २ जून रोजी नर्मदा विष्णू तागड (वय ५५ रा. सोनई धनगरगल्ली) यांचे गावातील दुकानात दुपारी १ वाजता आरोपी सागर अरुण खोसे, अरुण माधव खोसे, लताबाई अरुण खोसे, सुरेखा सागर खोसे (सर्व रा. मुळा कारखाना) व इतर दोन अनोळखी इसम यांनी दुकानात घुसून तोडफोड करत मारहाण केली. शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्याचबरोबर सून अर्चना हिच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून घेतल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार लबडे करत आहेत. दुसरी फिर्याद लता अरुण खोसे यांनी दिली. आरोपींच्या घरी गेले असता मारहाण करत सुरेखा सागर खोसे हिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून घेतले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. आरोपी विष्णू तागड, नर्मदा विष्णू तागड, सुनील विष्णू तागड, जय सुनील तागड, (सर्व रा. सोनई) यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. ना बाचकर हे करत आहेत.