नगर : हंगा गावात उमेद अभियांतर्गत कर्ज वितरण
Updated On:

पारनेर – तालुक्यातील हंगा या गावामध्ये विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त गावातील २४ गटांचे कर्ज मंजूर करून त्यापैकी तीन गटांना बँक ऑफ बडोदामार्फत कर्ज वितरण करण्यात आले. बँकेचे अधिकारी वर्गाकडून शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
या प्रसंगी हंगा गावचे सरपंच राजेंद्र शिंदे, उपसरपंच माया साळवे, संदीप वाबळे सर, किरण चव्हाण, स्वप्नाली तोडमल, सुजाता नगरे, तलाठी पवार, अंगणवाडी सेविका अलका नगरे,
उमेद अभियानाच्या महिला कीर्ती थोरात, शबाना शेख, पूनम शिंदे, वैशाली रासकर, मनीषा वाघ, नंदा रासकर, सुवर्णा नगरे यासह उमेदच्या पदाधिकाऱ्यांसह गावातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
उमेद अभियांनातर्गत पदाधिकारी यांनी अभियान बाबत सविस्तर माहिती दिली.





