नगर : आ. कानडे यांच्याहस्ते कामांचे भूमिपूजन
Updated On:

श्रीरामपूर – आमदार लहू कानडे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या श्रीरामपूर तालुक्यातील रस्त्यांच्या ४ कोटी ७ लाख खर्चाच्या कामांचे भूमिपूजन उद्या सोमवार दि.४ डिसेंबर रोजी आ. कानडे यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी कमालपूर, टाकळीभान, कारेगाव, फत्याबाद येथे भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. माजी नगरसेवक अशोक कानडे, काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीरामपूर तालुका काॅंग्रेस कमिटीचे पदाधिकारी तसेच संबंधित गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी केले आहे.





