पुणे मनपा आयुक्तांना भेटण्यास नागरिकांना बंदी
Updated On:

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर पालिका आयुक्तांना भेटण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. सद्यस्थितीत कोरोना विषाणूसंदर्भात प्रतिबंधात्मक उपाय योजना मनपा प्रशासनाकडून सुरु आहेत.
पुढील शासन निर्देश येईपर्यंत महापालिका आयुक्त नागरिकांना भेटू शकणार नाहीत अशा आशयाचे फलक महानगर पालिकेत लावण्यात आले आहे.
नागरिकांचे अर्ज, निवेदने महानगर पालिका आयुक्त कार्यालयात आणि मनपा स्वागत कक्षात कार्यालयीन स्वीकारले जातील. नागरिकांनी याची नोंदणी घेऊन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.





