सरकारी कार्यालयात सिगारेटचा धूर, नोकरीवर पडला काळा फटका.! थेट CM सोरेन यांचा आदेश

Government office – झारखंडमधील चाईबासा जिल्हाधिकारी कार्यालयात अनुशासनहीनता आणि व्यसनाचा एक प्रकार समोर आला आहे. इथे सरकारी नोकर जगमोहन सोरेन यांचा कार्यालयात सिगारेट ओढतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
हा व्हिडिओ समोर येताच संपूर्ण प्रशासकीय विभागात खळबळ उडाली. हे प्रकरण मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यापर्यंत पोहोचताच, त्यांनी त्वरित कारवाई करत जगमोहन सोरेन यांना तात्काळ निलंबित केले आहे.
कुणीतरी जगमोहन सोरेन यांचे कृत्य मोबाईल फोनवर रेकॉर्ड केले आणि ते सोशल मीडियावर शेअर केले. काही तासांतच हा व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येते की संबंधित कर्मचारी सरकारी कागदपत्रांच्या जवळच असून सिगारेट ओढत आहे.
हे कृत्य कार्यालयीन शिष्टाचार आणि नियमांचे घोर उल्लंघन आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेतली. हे अश्लील वर्तन मानून त्यांनी चाईबासाच्या जिल्हादंडाधिकाऱ्यांना त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले.
चाईबासा जिल्हादंडाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांनुसार, झारखंड सरकारी सेवक (वर्गीकरण, नियंत्रण आणि अपील) नियम-२०१६ च्या कलम ९ (अ) अंतर्गत व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सरकारी कार्यालयात अश्लील कृत्याबद्दल सार्वजनिक सेवक जगमोहन सोरेन यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच, उपविकास आयुक्तांना शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.





