‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील छोटा टप्पू आता दिसणार नव्या रूपात

Pushpa Impossible New Promo | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील छोट्या टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता भव्य गांधी आता पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. टप्पूच्या भूमिकेमुळे भव्यला मोठी लोकप्रियता मिळाली. त्याच्या या भूमिकेचे प्रेक्षकांकडूनही मोठे कौतुक झाले. लहानपणी खोडकर दाखवलेला टप्पू आता मोठा झाला आहे.
लहानपणीच्या मस्तीखोर टप्पूची भूमिका भव्य गांधी यांनी साकारली होती. भव्य गांधीने हा शो सोडल्यानंतर चित्रपटांमध्येही काम केले. आता पुन्हा एकदा भव्य गांधी एका नव्या रुपात दिसणार आहे. Pushpa Impossible New Promo |
View this post on Instagram
‘पुष्पा इम्पॉसिबल’ या लोकप्रिय शो मध्ये भव्य गांधी झळकणार आहे. या शोमध्ये तो निगेटिव्ह भूमिकेत दिसत आहे. यात भव्य गांधीच्या पात्राचे नाव ‘प्रभास’ आहे. यात त्याच्या मनात सूडाची भावना असल्याचे दाखवण्यात आले आहे. या शोच्या माध्यमातून भव्य गांधी पुन्हा एकदा टिव्हीवर पदार्पण करत आहे. ‘पुष्पा इम्पॉसिबल’ शोचा प्रोमोमध्ये भव्य गांधी खतरनाक लूकमध्ये दिसत आहे. Pushpa Impossible New Promo |
पहिल्यांदाच अशी वेगळी भूमिका भव्य गांधी साकारणार आहे. ही आव्हानात्मक भव्य गांधी कसा साकारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रभासच्या व्हिलनमधील या भूमिकेमुळेशोमध्ये नवीन ट्विस्ट येणार आहे. या वेगळ्या भूमिकेत भव्यला पाहण्यासाठी चाहते देखील आतुर आहेत.
हेही वाचा:
अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर विचित्र अपघात; पाच वाहने एकमेकांना धडकली





