अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर विचित्र अपघात; पाच वाहने एकमेकांना धडकली
Updated On:

नेवासा – अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरीपुल येथे विचित्र अपघात झाला आहे. एक माल वाहतुक ट्रक हा रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका दुकानात घुसला. या ट्रकचा अपघात झाल्यानंतर सुमारे पाच वाहने एका मागून एक अशी या अपघातग्रस्त ट्रकला धडकली. हा अपघात शनिवार (दि.१४) रोजी पहाटेच्या सुमारास घडला.
हा अपघात इतका भीषण होता, की वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातात एक जण किरकोळ जखमी झाला. मात्र या अपघातानंतर चार तास वाहतुक ठप्प झाल्याने वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.





