अभिनेता चिरंजीवींच्या नावाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

Chiranjeev Guinness World Record | दाक्षिणात्य अभिनेता चिरंजीवींच्या नावाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश करण्यात आला आहे. 22 सप्टेंबर रोजी, अभिनेत्याला त्याच्या 45 वर्षांतील 156 चित्रपटांमधील 537 गाण्यांमध्ये 24 हजार डान्स स्टेप्स सादर केल्याबद्दल त्यांना अधिकृतपणे सन्मान मिळाला. चिरंजीवी यांनी 1978 मध्ये भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती.
चिरंजीवी कोनिडेलाला मिळालेल्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या सर्टिफिकेटवर लिहिली होतं की, भारतीय चित्रपटसृष्टीतील सगळ्यात यशस्वी अभिनेता आणि डान्सर चिरंजीवी उर्फ मेगा स्टार. यावेळी त्यांच्यासोबत बॉलिवूड अभिनेता आमिर खान देखील तिथे उपस्थित होता.
Mega Star #Chiranjeevi Garu is now a Guinness Record holder!@KChiruTweets Garu received the Guinness record for being the Most Prolific Film Star in Indian Cinema. He has been the star of Telugu cinema for a whopping 156 films in a span of 45 years, achieving an unbeatable feat… pic.twitter.com/dZ27wOMPez
— Vamsi Kaka (@vamsikaka) September 22, 2024
मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डीनं X वर एक पोस्ट शेअर करत चिरंजीवीला शुभेच्छा देत तेलुगू लोकांसाठी ही गर्वाची गोष्ट असल्याचे म्हंटले आहे. तर टीपीसीसी अध्यक्ष महेश गौड, मंत्री कोमाटिरेड्डी वेंकट रेड्डी, उत्तम कुमार रेड्डी आणि इतर कलाकारांनी देखील चिरंजीवी यांना सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत.
चिरंजीवी यांनी ‘पुनाधिरल्लू’ या चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. पण, ‘मन वुरी पांडावुलु’ हा त्यांचा पहिला प्रदर्शित झालेला चित्रपट होता. 1982 मध्ये रिलीज झालेला ‘इंतलो रामय्या वीधिलो कृष्णय्या’ हा चित्रपट हिट ठरला. तर ‘कैदी’ या चित्रपटामुळे चिरंजीवी लोकप्रिय झाले.
चिरंजीवी शेवटचे 2023 च्या भोला शंकर मध्ये दिसले होते. लवकरच ते ‘विश्वंभरा’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट 10 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.




