चीनची नवी चाल; भारताच्या समुद्र हद्दीत आढळले हेरगिरी करणारे जहाज; नौदल अॅक्शन मोडवर

China Spy Ships | भारत-पाकिस्तानमधील तणावादरम्यान चीनच्या देखील कुरापती सुरू झाल्या आहेत. चीनचं हेरगिरी करणारं जहाज भारताच्या समुद्री हद्दीत आढळून आले आहे. यानंतर भारतीय नौदल तात्काळ कारवाईत उतरली असून सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे.
भारत-पाकिस्तान तणावादरम्यान चीनचे गुप्तचर जहाज ‘दा यांग हाओ’ मलक्का सामुद्रधुनीतून थेट बंगालच्या उपसागरात पोहोचले. चीननं या जहाजाला संशोधन जहाज म्हणून संबोधलं असलं तरी भारत आणि इतर देश या चिनी जहाजाला गुप्तहेर जहाजं म्हणून ओळखतात. हे जहाज समुद्राच्या खोलीचा नकाशा तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. या जहाजाच्या मदतीने चीन क्षेपणास्त्रांचा मागोवा घेण्यास आणि पाणबुड्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सक्षम झाला आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनही ऐकू शकतं.
चीनच्या जहाजांच्या या फ्लीटमध्ये एकूण चार जहाज आहेत. यांपैकी तीन जहाजं अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मोक्या ठिकाणी तैनात झाल्या आहेत. जहाजांची ही फ्लीट संशोधन करणारी असल्याचं सांगितलं जात असलं तरी ही जहाजं हेरगिरी जहाजं असल्याची चर्चा सुरु आहे.
चीनच्या जहाजांना रोखण्याचा प्रयत्न
भारत नेहमीच चीनच्या संशोधन जहाजांना बंगालच्या उपसागरात येण्यापासून रोखत आला आहे. मग तो बांगलादेश असो, श्रीलंका असो वा मालदीव, भारत आपल्या प्रत्येक शेजारी देशांसोबत मिळून चीनला या क्षेत्रात येण्यापासून रोखण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करतो. भारत-पाकिस्तान संघर्ष सुरू असतानाचे चीनचे अत्याधुनिक संशोधन जहाज येथे पोहोचले.
अलिकडच्या काळात, क्षेपणास्त्र चाचण्या आणि इतर लष्करी कारवायांच्या वेळी डेटा गोळा करण्याच्या नावाखाली अशी जहाजं भारताच्या शेजारील भागात घुसली आहेत. ओपन-सोर्स इंटेलिजेंसचे तज्ज्ञ डेमियन सायमन यांनी शेअर केलेल्या नकाशानुसार, हे जहाज मलाक्का सामुद्रधुनीतून पुढे भारताच्या समुद्री हद्दीत येत आहे आणि श्रीलंकेच्या दक्षिणेकडे जात असल्याचं दिसतं आहे. China Spy Ships |
हेही वाचा:





