चीनला भरणार धडकी; लडाखमध्ये छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ STATUE | भारतीय लष्कराने पूर्व लडाखमध्ये भारत चीन सीमेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारला आहे. हा पुतळा चीनबरोबरच्या सीमेवरील वास्तविक नियंत्रण रेषेच्या (LAC) जवळ पँगॉन्ग तलावाच्या किनार्यावर १४,३०० फुट उंचीवर उभारण्यात आला आहे.
लष्कराच्या १४ कॉर्प्स (फायर अँड फ्यूरी कॉर्प्स)चे जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल हितेश भल्ला यांनी या पुतळ्याचे गुरूवारी २६ डिसेंबर रोजी अनावरण केले. CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ STATUE |
शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये शिवरायांच्या पुतळ्यावरील कापड उचलले जाताना दिसत आहेत. याबरोबरच पुतळ्याशेजारी भगवा ध्वज देखील फडकताना पाहायला मिळत आहे. CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ STATUE |
#WATCH | Ladakh: On 26 Dec 2024, a statue of Chhatrapati Shivaji Maharaj was inaugurated on the banks of Pangong Tso at an altitude of 14,300 feet. The towering symbol of valour, vision and unwavering justice was inaugurated by Lt Gen Hitesh Bhalla, SC, SM, VSM, GOC Fire and Fury… pic.twitter.com/Kc06twlnnj
— ANI (@ANI) December 28, 2024
भारत आणि चीनने डेमचोक आणि डेपसांग भागातून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याच्या काही दिवसांनंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. २१ ऑक्टोबर रोजी झालेल्या करारानंतर भारत आणि चीन या देशांनी सैन्य मागे घेण्याचे काम पूर्ण केले आहे.
पूर्व लडाखमध्ये ५ मे २०२० रोजी पँगॉन्ग लेक परिसरात हिंसक संघर्ष झाला होता, यानंतर दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळ चाललेल्या लष्करी आणि राजकीय चर्चांनंतर वाद असलेल्या भागातून दोन्ही बाजूंनी सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, १९६२ मध्ये चीन-भारत युद्धानंतर या क्षेत्राने अनेकदा संघर्ष पाहिला आहे. मे २०२० मध्येही जवळपास २५० सैनिक एकमेकांना भिडले होते.
हेही वाचा:





