China zero Covid : चीनमध्ये करोना निर्बंधामुळे हिंसाचार

बीजिंग – चीनमध्ये ‘झिरो कोविड’ धोरणाच्या कठोर अंमलबजावणीमुळे हिंसक निदर्शनांना सुरुवात झाली आहे. हैझाऊ जिल्ह्यामध्ये वस्त्रोद्योग कंपनीत कामगारांना आतच कोंडून ठेवण्यात आले. त्यानंतर कामगारांनी ही निदर्शने करायला सुरुवात केली.
कंपनीत काम करणाऱ्या स्थलांतरित कामगारांनी या निदर्शनांना प्रारंभ केला. पैसे नसल्यामुळे खाद्यपदार्थ आणि औषधेही विकत घेता येत नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. गुवांझाऊ शहरात अशासारख्या अन्य 5 घटना घडल्यानंतर लोकांनी या निर्बंधांना विरोध करायला सुरुवात केली.
G20 Summit : ‘जी-20’ परिषदेदरम्यान जिनपिंग आणि ट्रुडो यांच्यात शाब्दिक बाचाबाची
एका ठिकाणी तपासणीसाठी उभारलेल्या चेकपॉईंटची लोकांनी मोडतोड केली. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी तेथे सशस्त्र पोलिसांना पाचारण करावे लागले होते. चीनमध्ये पुन्हा एकदा करोनाचे रुग्ण सापडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे संभाव्य लॉकडाऊनच्या भीतीने लोकांनी निर्बंधांना विरोध करायला सुरुवात केली आहे.





