Nuclear power plant : पाकिस्तानमध्ये चीन उभारणार अणुउर्जा प्रकल्प

इस्लामाबाद :- आर्थिक अडचणीत सापडलेल्या पाकिस्तानमध्ये चीनच्या मदतीने अणुउर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पंजाब प्रांतात उभारल्या जाणाऱ्या या अणुउर्जा प्रकल्पासाठी पाकिस्तान आणि चीन दरम्यान आज करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
पंजाब प्रांताल्या मियानवाली जिल्ह्यातल्या चशमा येथे एकूण 1,200 मेगावॅट उर्जा क्षमतेच्या या उर्जा प्रकल्पाच्या उभारणीमुळे पाकिस्तान आणि चीन दरम्यानचे धोरणात्मक भागीदारीचे संबंध अधिक घट्ट होणार आहेत.
हा प्रकल्प विलंब न होता पूर्ण झाल्यास पाकिस्तान आणि चीनमधील आर्थिक सहकार्याचे संबंध अधिक वृद्धींगत होतील, अशी आशा पंतप्रधान शेहबाझ शरीफ यांनी व्यक्त केली आहे.
या प्रकल्पासाठी चीनमधून पाकिस्तानमध्ये 4.8 अब्ज डॉलरची गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पासाठी पाकिस्तानने चिनी कंपन्यांना मोठी सवलत दिली आहे. त्यामुळे या कंपन्यांचे अब्जावधी रुपयांची बचत होणार आहे, असे शेहबाझ शरीफ यांनी म्हटले आहे.





