पाकिस्तान, चीनमध्ये निसर्गाचा कोप ! दोन्ही देशात वादळाचा तडाखा, आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू

China-Pakistan Storm | पाकिस्तान आणि चीन सध्या निसर्गाच्या कोपाचा सामना करत आहेत. शनिवारी दोन्ही देशांत आलेल्या वादळ आणि पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानमध्ये २२ तर चीनमध्ये ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या वादळ आणि पुरात डझनभर लोक जखमीही झालेत. पुरानंतर चीनमधील लोक मलबा हटवण्यात व्यस्त आहेत.
पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात या वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रांतीय आपत्ती व्यवस्थापनानुसार, गेल्या ४८ तासांत पुरामुळे २२ जणांचा मृत्यू झाला आहे. क्वेट्टासह बलुचिस्तानच्या अनेक जिल्ह्यांना मुसळधार पाऊस आणि वादळाचा सामना करावा लागला. मुसळधार पावसामुळे अनेक शहरांना पुराचा तडाखा बसला. पाकिस्तानच्या हवामान खात्याने ही माहिती दिली. शनिवारी क्वेटा खोऱ्यात वादळ, मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. त्यामुळे मुख्य रस्ते व रस्त्यांवर पाणी साचले होते.
एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने सांगितले की, जोरदार पुरामुळे काही घरे पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेली आहेत. नोश्की जिल्ह्यात क्वेटा-तफ्तान महामार्गाचा काही भाग पाण्यात बुडाला, त्यामुळे इराणहून लिक्विड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) घेऊन जाणारा मोठा टँकरही पाण्यात बुडाला.
चीनमधील ग्वांगझू शहराला वादळाचा तडाखा बसला China-Pakistan Storm |
दुसरीकडे, चीनमधील ग्वांगझू शहरात विनाशकारी वादळ आले. या शहरात मोठ्या प्रमाणात कंपन्या असून, शनिवारी आलेल्या वादळामुळे औद्योगिक परिसरात मोठी हाहाकार उडाला. वादळामुळे 5 जणांचा मृत्यू झाला असून, वादळामुळे डझनभर लोक जखमी झाल्याची माहिती आहे. वादळानंतर ग्वांगझू शहरात ढिगारा पसरला असून, तो हटवण्याचे काम सुरू आहे.
चीनमध्ये कंपन्यांची छत उडाली China-Pakistan Storm |
चीनच्या सरकारी मीडियानुसार, या वादळामुळे 140 हून अधिक कारखान्यांच्या इमारतींचे नुकसान झाले आहे. शनिवारी दुपारी गारपिटीसह जोरदार वादळ आले, त्यामुळे वीज यंत्रणा ठप्प झाली. या वादळात सुमारे 33 जण जखमी झाल्याचे चिनी अधिकाऱ्यांनी सांगितले. न्यूज एजन्सी एपीने दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये वादळ इतके जोरदार होते की अनेक घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.





