ट्रम्प, मस्क कारखान्यात मजूर; अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा विरोध करत चीनने शेअर केले मजेशीर AI व्हिडिओ

Trump Tarrifs | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जगभरात आर्थिक अनिश्चितता पाहायला मिळत आहे. ट्रम्प यांनी 90 दिवसांसाठी या धोरणाला स्थगिती दिली असली तरीही चीवरील शुल्क मात्र कायम ठेवले आहे. चीनकडूनही अमेरिकेला जशास तसे प्रत्युत्तर दिले जात आहे. केवळ आर्थिक धोरणचं नाही, तर मीम्सच्या माध्यमातूनही चीन अमेरिकेवर निशाणा साधला जात आहे.
चीनने सोशल मीडियाच्या माध्यमातून अमेरिकेची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावरून AI जनरेटेड मीम्स आणि मजेशीर व्हिडिओ शेअर केले जात आहे.
ट्रम्प आणि मस्क – शूज बनवणाऱ्या कारखान्यात करतायत काम
हाँगकाँगमधील फिनिक्स टीव्हीने शेअर केलेल्या एका व्हायरल व्हिडिओमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांना Nike शूज बनवणाऱ्या कारखान्यात काम करताना दाखवण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये दोघंही कामगार असल्याचे दाखवण्यात आले आहे.
आणखी एका व्हिडिओत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स हे लाल टोपी आणि डेनिम घालून आयफोन तयार करताना दाखवले आहे. अमेरिकन नेत्यांची खिल्ली उडवणारे हे एआय व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
This AI-generated video has gone viral on social media, portraying scenes of Americans working hard in factories. It imagines what the U.S. might look like under Trump’s so-called “reindustrialization” gambit. pic.twitter.com/NoRpz2yR1K
— 鳳凰衛視PhoenixTV (@PhoenixTVHK) April 10, 2025
हे व्हिडिओ आणि मीम्स फक्त सामान्य युजर्सपुरतेच मर्यादित नसून, चिनी सरकार आणि अधिकृत माध्यमांचाही त्यामध्ये सहभाग आहे. चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी X (ट्विटर) वर एक मीम पोस्ट करत दावा केला की, “टॅरिफमुळे ट्रम्प यांच्या प्रसिद्ध अमेरिकन वस्तूंची किंमत 50% वाढली आहे.”
चीनमधील अमेरिकन दूतावासाचे प्रवक्ते लिऊ पेंग्यू यांनीही एक मीम शेअर केलं आहे, ज्यामध्ये Rednote या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अमेरिकन वस्तूंची किंमत दुप्पट झाल्याचं दाखवण्यात आलं आहे.
या ट्रेंडमध्ये अनेक AI-द्वारे तयार करण्यात आलेले मीम्स आणि व्हिडिओमध्ये अमेरिकन नागरिक कारखान्यांमध्ये काम करताना दाखवले गेले आहेत. लठ्ठ कामगारांना काम करताना दाखवून ट्रम्प यांच्या दिलेल्या ‘मेक इन अमेरिका’ आश्वासनांची खिल्ली उडवण्यात आली आहे.
या व्हिडिओ आणि मीम्समधून दाखवण्यात येतंय की, अमेरिकन लोक स्वतः उत्पादन करू शकत नाहीत, आणि ट्रम्प यांच्या स्वदेशी उत्पादनाच्या घोषणा केवळ निवडणूक प्रचारापुरत्याच मर्यादित आहेत. हे व्हिडिओ ट्विटरसह सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहेत.





