China Gold Reserves : चीनमध्ये सापडला सोन्याचा सर्वात मोठा खजिना, किंमत एवढी की ऐकून थक्क व्हाल….

बीजिंग – चीनमध्ये सोन्याचा मोठा साठा सापडला आहे. हुनान प्रांताच्या मध्यवर्ती भागात त्यांना हे सोन्याचे भांडार सापडले आहे. हुनान प्रांताच्या भूगर्भशास्त्र ब्युरोने याबाबतची माहिती दिली आहे. सुमारे 82.8 अब्ज डॉलर किमतीचा हा साठा असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
भारतीय चलनात त्याची किंमत 69,30,62,36,00,000 रुपयांपेक्षा जास्त आहे. चीन हा जगातील सर्वात मोठा सोने उत्पादक देश आहे. जागतिक सुवर्ण परिषदेच्या आकडेवारीनुसार, 2023 मध्ये जागतिक सोन्याच्या उत्पादनात चीनचा वाटा सुमारे 10% होता. दरम्यान, माध्यमांवर देण्यात आलेल्या एका निवेदनानुसार, भूवैज्ञानिकांनी वांगू सोन्याच्या भांडारामध्ये 2,000 मीटर (6,561 फूट) पेक्षा जास्त खोलीवर सोन्याचे साठे आढळले आहेत.
पिंगजियांग काउंटीमध्ये 40 हून अधिक ठिकाणे ओळखली गेली आहेत. प्राथमिक उत्खनन क्षेत्रात एकूण 300.2 टन सोन्याचा साठा आढळून आला, ज्यामध्ये धातूचे सर्वाधिक प्रमाण 138 ग्रॅम (4.9 औंस) प्रति टन इतके आहे. अंदाजानुसार, 3,000 मीटरपेक्षा जास्त खोलीवर, सोन्याचा साठा 1,000 टनांपेक्षा जास्त असू शकतो. सध्याच्या किंमतीनुसार 600 अब्ज युआन म्हणजे ८२.८ अब्ज डॉलरपर्यंत हा साठा असू शकतो.
Nepal Army : भारतीय लष्करप्रमुख द्विवेदींना नेपाळची मानद जनरल पदवी…
2024 च्या दुसऱ्या तिमाहीत चीनचा सोन्याचा साठा 2,264.32 टन इतका होता, जो आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर आहे. पीपल्स बँक ऑफ चायनाने सोन्याचा साठा नोंदवणे पुन्हा सुरू केल्यावर नोव्हेंबर 2022 पासून यात 314 टनांची वाढ झाली आहे.





