Chimbali News : चिंबळी येथील जिल्हा परिषद शाळेत उत्साहात रंगला आषाढी दिंडी सोहळा
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचे औचित्य साधून चिंबळी (Chimbali News) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी एक भव्य आणि विलोभनीय दिंडी सोहळा काढून. विठू नामाच्या गजराने आणि टाळ-मृदुंगाच्या नादाने संपूर्ण चिंबळी परिसर भक्तिमय झाला होता.

Chimbali News : आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचे औचित्य साधून चिंबळी (Chimbali News) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी एक भव्य आणि विलोभनीय दिंडी सोहळा काढून. विठू नामाच्या गजराने आणि टाळ-मृदुंगाच्या नादाने संपूर्ण चिंबळी परिसर भक्तिमय झाला होता.
दिंडी सोहळ्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी पोशाख परिधान केला होता.यावेळी मुलांनी धोतर, कुर्ता, गांधी टोपी आणि कपाळावर बुक्का लावून विठ्ठल रूपी नटली होती, तर मुलींनी नऊवारी साडी नेसून, डोक्यावर तुळशी वृंदावन व कलश घेऊन उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.
शाळेच्या प्रांगणातून विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करून पालखी सोहळ्याला (Chimbali News) सुरुवात झाली. ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ आणि ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ या जयघोषाने विद्यार्थ्यांनी संपूर्ण गाव दणाणून सोडले. गावातील मुख्य रस्ते आणि चौकाचौकातून ही दिंडी काढण्यात आली. ठिकठिकाणी ग्रामस्थांनी आणि महिलांनी पालखीचे दर्शन घेतले व बालवारकऱ्यांचे स्वागत केले.
दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी रिंगण सोहळा देखील साजरा केला. विठ्ठल नामाचा गजर करत विद्यार्थ्यांनी फुगड्या, झिम्मा यांसारखे पारंपरिक खेळ खेळले. या बालवारकऱ्यांचा उत्साह पाहून ग्रामस्थ भारावून गेले होते.
“विद्यार्थ्यांना आपल्या महाराष्ट्राच्या थोर संत परंपरेची आणि वारी संस्कृतीची ओळख व्हावी, तसेच त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत या उद्देशाने या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते,” अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय चव्हाण यांनी दिली. हा सोहळा (Chimbali News) यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, उपस्थित होते.






