Child Safety Alert : काळभोरनगर हादरलं! महिलेने चिमुरड्याला जवळ बोलावलं, अन् पुढे जे घडलं ते वाचून काळजाचा ठोका चुकेल
Child Safety Alert : संशयास्पद महिलेच्या हालचालींमुळे काळभोरनगरमध्ये गोंधळ; मुलाने आरडाओरडा केल्याने अनर्थ टळला, नागरिकांनी महिलेला पकडले.

Child Safety Alert – वार सोमवार, वेळ दुपारी साडेबारा वाजताची, एक महिला परिसरात बराच वेळ संशयास्पदरीत्या फिरताना दिसत होती. खेळत असलेल्या एका मुलाला तिने जवळ बोलावले. सुरुवातीला साधा संवाद वाटणारा हा प्रकार काही क्षणांतच गंभीर वळण घेऊ लागला. परिस्थितीची चाहूल लागताच त्या मुलाने क्षणाचाही विलंब न लावता तेथून पळ काढला आणि थेट घर गाठले. घडलेला प्रकार ऐकताच पालकांच्या काळजाचा ठोका चुकला.
दरम्यान, बाहेर येऊन पाहणी केली असता ती महिला अजूनही परिसरातच थांबलेली दिसली. पालकांनी आरडाओरडा करताच काही क्षणांतच नागरिकांचा जमाव जमला. वातावरण तणावपूर्ण बनले असतानाच पोलिसांना कळविण्यात आले. पोलीस घटनास्थळी दाखल होताच महिलेला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान या प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळाले. सुरुवातीला महिलेने आर्थिक अडचणीमुळे मुलाला पळविण्याचा विचार केल्याचे सांगितले.
ती महिला मोहननगर परिसरातील राहणारी होती. पोलिसांनी तिच्या पतीला पाचारण केले. मात्र पुढे तिच्या कुटुंबीयांकडून वेगळीच माहिती समोर आली. तिची मानसिक स्थिती बिघडलेली असल्याचा दावा पतीने केला. त्यामुळे या घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर काळभोरनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पालकांमध्ये चिंतेची भावना वाढली आहे. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.





