Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा भाजप-ठाकरेसेना अन् राष्ट्रवादीला जोरदार धक्का; बड्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश
Maharashtra Politics : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मतदारसंघात आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत मोठा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

Maharashtra Politics : राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा आलेख उंचावत असतानाच, बुलडाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात विरोधकांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.
भाजप, शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या तिन्ही पक्षांतील बड्या नेत्यांसह शेकडो पदाधिकाऱ्यांनी आज अधिकृतपणे शिंदेसेनेत प्रवेश केला. आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
चिखली मतदारसंघातील राजकीय समीकरणे या पक्षप्रवेशामुळे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. महायुतीत सोबत असूनही भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याने स्थानिक पातळीवर चर्चेला उधाण आले आहे. प्रामुख्याने भाजप, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) या पक्षांना भगदाड पडले आहे:
आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यशैलीवर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धोरणांवर विश्वास ठेवूनच हा प्रवेश केल्याचे कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले. “राज्यातील विकासकामांचा वेग पाहून सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेकडे आकर्षित होत आहेत,” असा विश्वास यावेळी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला.





