Political News : मुख्यमंत्र्यांच्या निष्ठावंत शिलेदाराचा मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा; राज्याच्या राजकारणात खळबळ
Political News : मुख्यमंत्र्यांच्या निष्ठावंत शिलेदाराने मंत्रिमंडळातून मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Political News : कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या 48 तासांत ज्येष्ठ काँग्रेस नेते रामलिंगा रेड्डी यांनी राजीनामा दिला आहे. खातेवाटपावरून नाराज झालेल्या रेड्डी यांच्या निर्णयामुळे राज्यातील काँग्रेस सरकारसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. (Political News)
मिळालेल्या माहितीनुसार, रामलिंगा रेड्डी यांना बंगळुरू विकास खाते मिळण्याची अपेक्षा होती. मुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी याबाबत दोन वेळा आश्वासन दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र खातेवाटपात त्यांना पाटबंधारे विभाग देण्यात आला. हे खाते स्वीकारण्यास त्यांनी नकार देत मंत्रीपदाचा राजीनामा दिला. (Political News)
खातेवाटपाच्या बैठकीदरम्यानही रेड्डी यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी बैठक अर्धवट सोडून मुख्यमंत्री शिवकुमार यांना 2023 मध्ये दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली होती. त्यानंतर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. (Political News)
विशेष म्हणजे, आता बंगळुरू विकास खाते दिले तरी मंत्रीपद स्वीकारणार नसल्याची ठाम भूमिका रामलिंगा रेड्डी यांनी घेतली आहे. ते केवळ आमदार म्हणून काम करतील, मात्र काँग्रेस पक्षासोबत कायम राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. (Political News)
दरम्यान, या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना डीके शिवकुमार यांनी रामलिंगा रेड्डी हे आपले जवळचे मित्र आणि पक्षातील वरिष्ठ नेते असल्याचे सांगितले. हा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Political News)
या वादावरून भाजपने काँग्रेस सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद आणि गटबाजी सुरू असल्याचा आरोप केला. तर काँग्रेस नेते प्रियांक खर्गे यांनी रेड्डी हे पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचे नेते असून हा वाद लवकरच मिटेल, असे म्हटले आहे. (Political News)
73 वर्षीय रामलिंगा रेड्डी हे बंगळुरूमधील काँग्रेसचे प्रभावशाली नेते मानले जातात. बीटीएम लेआउट मतदारसंघातून ते तब्बल आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. यापूर्वी त्यांनी परिवहन, मुजराई आणि गृहमंत्रीपदाची जबाबदारीही सांभाळली आहे. (Political News)





