मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त स्वागत

वसंतदादा शुगर इंस्टिट्यूटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विविध प्रश्नी चर्चा
मांजरी – ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पंढरी असलेल्या वसंतदादा शुगर इंस्टिट्यूट (vsi) येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वागत जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर (माऊली) कटके यांच्यासह स्थानिक शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात केले.
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतर ठाकरे हे आमचे “विठ्ठल” असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहेत. कर्जमाफी नंतर मुख्यमंत्री ठाकरे यांचा हा पहिलाच शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी निगडीत कार्यक्रम असल्याने तसेच, राज्यातील ऊस उत्पादन शेतकरी आणि साखर उद्योग अडचणीत असल्याने ठाकरे यांच्या या भेटीचे महत्त्व वाढले आहे.
याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रमुख कटके हे मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार आहेत. पूर्व हवेलीतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्या संदर्भातही ठाकरे यांच्याशी कटके चर्चा करणार आहेत. यासह शिवसैनिकांशीही ठाकरे संवाद साधतील.
यावेळी शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर काटके, पुणे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे व शिवसेना हवेली तालुका प्रमुख, प्रशांत काळभोर व माजी तालुका प्रमुख दत्तानाना रायकर तसेच शिवसैनिक उपस्थित होते.





