Devendra Fadnavis : आज आषाढी एकादशीचा दिवस असल्याने पंढरपूरमध्ये राज्यभरातून मोठ्या संख्येने वारकरी दाखल झाले आहेत. या पवित्र दिवशी भाविक पंढरीतील चंद्रभागेत स्नान करून विठलाचे दर्शन घेत आहेत. आज पहाटे अडीच वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा पार पडली. त्यांनी सपत्नीक पूजा केली. तर यंदाच्या शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान नाशिक जिल्ह्यातील कैलास दामू उगले यांना मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महापूजेत सहभागी होण्याची संधी उगले कुटुंबाला मिळाली आहे. आषाढी एकादशी असल्याने या दिवसाचे विशेष महत्व आहे. दरवर्षी राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते पंढरपूर मंदिरातील विठ्ठल रुक्मिणी मातेची महापूजेचा केली जाते. यावर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय पूजा करण्यात आली. त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील पूजेत सहभागी झाल्या होत्या. पंढरपूरात मोठ्या संख्येने भाविक विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. कोण आहेत कैलास उगले ? नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील कैलास दामू उगले यांना वारकरी प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आषाढी एकादशीची विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्याचा मान मिळाला आहे. कैलास उगले हे शेतकरी असून ते गेल्या 12 वर्षांपासून पंढरीची नियमित वारी करत आहेत. त्यांच्या पत्नी कल्पना उगले यांनी वारकरी संप्रदायाशी असलेली निष्ठा आणि भक्तिभाव यामुळे वारकऱ्यांत मानाचे स्थान प्राप्त केले आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे २.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा पार पडली. यावेळी कैलास व कल्पना उगले हे दोघेही महापूजेत वारकरी प्रतिनिधी म्हणून सहभागी झाले होते. देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त आज पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी पत्नी अमृता व कन्या दिवीजा यांच्यासमवेत शासकीय महापूजा करण्याचे सौभाग्य लाभले. यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले आणि विठुमाऊली व रखुमाईच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील शेतकरी, कष्टकरी व सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रार्थना केली. -देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हेही वाचा :हरिनामाने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली !