मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक येणार पोहरादेवीत; राम नवमीनिमित्त सोहळ्याला राहणार हजर

Ram Navami 2025 | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्री राम नवमीनिमित्त आज (6 एप्रिल) पोहरादेवीच्या दर्शनासाठी वाशिमच्या दौऱ्यावर असणार आहे. वाशिमच्या पोहरादेवीत रामनवमी निमित्त मोठ्या यात्रा महोत्सवाचे आयोजन केलं जाते. या यात्रेला देश, विदेशातील बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येनं येत असतात.
यातच आता देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस पोहरादेवी नतमस्तक होणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सकाळी 10:30 वा जगदंबा देवी, संत सेवालाल महाराजांची शासकीय पूजा होणार आहे. त्यानंतर फडणवीस 11 वाजता ते सभेला संबोधित करतील. यासाठी येथे मोठी तयारी देखील करण्यात आली आहे.
अयोध्येतही रामनवमीनिमित्त भव्य उत्सवाची तयारी
दुसरीकडे, भगवान श्री राम यांचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत रामनवमीनिमित्त भव्य उत्सवाची तयारी करण्यात आली आहे आणि यानिमित्ताने ड्रोनद्वारे शरयूचे पाणी भाविकांवर शिंपडले जाईल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनांनुसार, यावेळी भगवान श्री रामांच्या शहरात, अयोध्येत रामनवमीचा उत्सव ऐतिहासिक आणि भव्य पद्धतीने साजरा केला जाईल.
पहिल्यांदाच रामनवमीनिमित्त दीपोत्सव आयोजित केला जाणार आहे, ज्यामुळे हा उत्सव आणखी खास होईल. यासोबतच, अष्टमी आणि नवमीच्या दिवशी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम असतील.





