अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाल्यानंतर शरद पवार म्हणाले,’देशातील लोकशाहीचा पाया अजूनही मजबूत…’

Chief Minister Arvind Kejriwal । दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीनातून एक गोष्ट स्पष्ट होते की, देशातील लोकशाहीचा पाया अजूनही मजबूत आहे. सत्याच्या मार्गावर इतक्या दिवसांचा लढा आज सुरू झाला. असं म्हणत शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ते पुढे म्हणाले, “केजरीवाल यांच्या जामिनामुळे लोकशाही देशात चुकीच्या पद्धतीने कुणाला पदच्युत करण्याचा डाव कधीच यशस्वी होणार नाही, ही भावना दृढ झाली आहे.” तर, NCP (SP) खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “सत्यमेव जयते!” अरविंद केजरीवाल यांना जामीन दिल्याबद्दल आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो!
दरम्यान, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने केजरीवाल यांना १० लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि दोन जामिनावर जामीन मंजूर केला आहे. सुप्रीम कोर्टाने केजरीवाल यांना या प्रकरणाबाबत सार्वजनिक भाष्य करू नये असे निर्देश दिले.
हेही वाचा :
अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा; जामीन मंजूर, जेलमधून होणार सुटका
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाल्यावर ‘आपने व्हिडिओ शेअर करत दिली पहिली प्रतिक्रिया





