पुराव्याअभावी छोटा राजनची आणखी एका खटल्यातून निर्दोष सुटका; काय आहे प्रकरण? वाचा…
Updated On:

Chhota Rajan – १९९६ साली झालेल्या व्यापारी सय्यद फरीद मकबूल यांच्या हत्ये प्रकरणातून कुख्यात गुंड छोटा राजन याची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे. त्याचवेळी, विशेष सीबीआय न्यायालयाने कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा हस्तक असलेल्या एजाज लकडावाला याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
दरम्यान, या प्रकरणामुळे राजनवर दाखल असलेल्या खटल्यांपैकी आणखी एका खटल्यातून त्याची निर्दोष सुटका झाली आहे. विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी लकडावाला याला हत्येसह शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
हुसैन यांच्यावर गोळीबार करणाऱ्यांपैकी एकजण लकडावाला असल्याचा पोलिसांचा आरोप होता. दाऊद आणि राजन यांच्यात त्याकाळी सुरू असलेल्या टोळीयुद्धादरम्यान हा हल्ला झाला होता.





