Chhorii 2 Teaser | ‘छोरी 2’ चित्रपटाचा थरकाप उडवणारा टीझर रिलीज

Chhorii 2 Film | अभिनेत्री नुसरत भरुचाचा ‘छोरी’ हा एक हॉरर चित्रपट 2021 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाला मिळालेल्या मोठ्या यशानंतर ‘छोरी’ च्या दुसऱ्या भागाची देखील घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर चाहत्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आला होता. यातच आता निर्मात्यांनी ‘छोरी 2’ च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करत टीझर देखील रिलीज केला आहे.
प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मने सोशल मीडियावर ‘छोरी 2’चा टीझर शेअर केला आहे. या टीझरला देखील खतरनाक कॅप्शन देण्यात आले आहे. कॅप्शनमध्ये लिहिले की, “एक बार फिर…वो खेत, वो खतरा, वो खौफ…” या कॅप्शनने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. Chhorii 2 Film |
View this post on Instagram
एक छोटी मुलगी हातात कंदिलाचा दिवा घेऊन विहिरीजवळ जाते. अचानक तिचा पाय ओढून तिला खेचण्यात येते. पुढे पडक्या घरात नुसरत भरुचाची एन्ट्री होते. त्यानंतर चेहऱ्यावर दुपट्टा घेऊन भूताच्या रुपात सोहा अली खान दिसते. टीझरमधील तिचा लूक खूप भयानक आहे. ‘छोरी २’मध्ये नुसरत भरुचासह अनेक नवीन कलाकार दिसणार आहेत. विशेष म्हणजे मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनी सिनेमात खास भूमिकेत आहे. Chhorii 2 Film |
‘छोरी’ हा मराठी चित्रपट ‘लपाछपी’ रिमेक होता. आता चार वर्षांनी ‘छोरी 2’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट 11 एप्रिल रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. ‘छोरी 2’च्या दिग्दर्शनाची धुरा विशाल फुरिया यांनी सांभाळली आहे. ‘छोरी 2’ चित्रपटाचा टीझर पाहून चित्रपट पाहण्यासाठी चाहते आतुर असल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा:
ही रोहित पवारांची वृत्ती, त्याला सहआरोपी करा; गोपीचंद पाडळकरांची मागणी





