छत्तीसगडमध्ये मोठे यश! सुरक्षा दलांनी ४० नक्षलवाद्यांचा केला खात्मा ; मोठ्या प्रमाणात स्वयंचलित शस्त्रे जप्त

chhattisgarh naxal । छत्तीसगडच्या नारायणपूर-दंतेवाडा सीमेवरील माड भागात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. याठिकाणी सीआरपीएफ सोबत झालेल्या चकमकीत ४० नक्षलवादी ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्याकडून अनेक स्वयंचलित शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. सीआरपीएफ अजूनही परिसरात शोध मोहीम राबवत आहे.
मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद संपवायचा chhattisgarh naxal ।
नक्षलवाद्यांविरुद्धच्या या यशस्वी ऑपरेशनबद्दल छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी, “…हे एक मोठे ऑपरेशन आहे. मी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांच्या शौर्याला सलाम करतो… नक्षलवाद आता शेवटचा श्वास घेत आहे… राज्यातून नक्षलवाद नक्कीच संपणार आहे… नक्षलवादाच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नऊ महिन्यांत दोनदा राज्याचा दौरा केला आहे आणि त्यांचा संकल्प आहे आपल्याला मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद संपवायचा आहे.”असे म्हटले आहे.
यापूर्वी पोलिसांनी 7 नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात स्वयंचलित शस्त्रे जप्त केली होती. बस्तर भागात सुरक्षा जवानांनी 7 नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याने 2024 मध्ये आतापर्यंत मरण पावलेल्या नक्षलवाद्यांची संख्या 164 वर पोहोचली आहे. नारायणपूर-दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवरील अबुजमाड जंगलात शुक्रवारी दुपारी 1 च्या सुमारास गोळीबार सुरू झाला जेव्हा सुरक्षा कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी अभियानात होते, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
या वर्षात सुरक्षा दलांकडून 164 माओवाद्यांचा खात्मा chhattisgarh naxal ।
गोळीबार कमी झाल्यानंतर, चकमकीच्या ठिकाणाहून सात नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि एके-47 रायफल आणि एक एसएलआर (सेल्फ-लोडिंग रायफल) यासह शस्त्रांचा साठा जप्त करण्यात आला, असे अधिकाऱ्याने सांगितले. परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या चकमकीनंतर, या वर्षी आतापर्यंत दंतेवाडा आणि नारायणपूरसह सात जिल्ह्यांचा समावेश असलेल्या बस्तर प्रदेशात स्वतंत्र चकमकीत सुरक्षा दलांनी 164 माओवादी मारले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.





