Plane Crash : मोठी दुर्घटना..! खासगी विमानाचा भीषण अपघात; थेट डोंगराला जाऊन धडकलं, परिसरात खळबळ
Plane Crash : एका खासगी विमानाचा भीषण अपघात झाला आहे. आरा टेकड्यांमध्ये विमान डोंगराला धडकल्याने मोठी जीवितहानी झाल्याची भीती आहे

Plane Crash : छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली असून, एका खासगी विमानाचा भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान आरा टेकड्यांमध्ये जाऊन डोंगराला धडकल्याने कोसळले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Plane Crash)
स्थानिकांच्या माहितीनुसार, जशपूरमधील नारायणपूर भागातील रतनपहळी जंगल परिसरात हे चार्टर्ड विमान झाडांना धडकले आणि त्यानंतर भीषण स्फोटासह आगीच्या ज्वाला उसळल्या. अपघातानंतर आकाशात धुराचे मोठे लोट दिसून आले. (Plane Crash)

Plane Crash : मोठी दुर्घटना..! खासगी विमानाचा भीषण अपघात; थेट डोंगराला जाऊन धडकलं, परिसरात खळबळ
या विमानात किती प्रवासी होते आणि त्यांची ओळख काय आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र या दुर्घटनेत मोठी जिवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Plane Crash)
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले आहे. डोंगराळ आणि जंगल परिसर असल्याने मदतकार्याला काही अडचणी येत असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेचा तपास सुरू असून, पुढील माहितीची प्रतीक्षा आहे. (Plane Crash)





