मोठी बातमी! औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’! नामांतरास केंद्राची मंजूरी

मुंबई – औरंगाबादचे नाव “छत्रपती संभाजीनगर’ व उस्मानाबादचे “धाराशिव’ करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला शुक्रवारी केंद्राने मंजुरी दिली आहे. त्यानुसार, कित्येक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या या दोन जिल्हांच्या नामांतरावर अखेर केंद्राकडूूनही शिक्कामोर्तब करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
➡️ औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’,
➡️ उस्मानाबादचे ‘धाराशिव’ !
राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी !
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री मा. अमितभाई शाह यांचे कोटी-कोटी आभार!
मुख्यमंत्री @mieknathshinde जी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’…! pic.twitter.com/IfXbdFec7r— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 24, 2023
या जिल्ह्यांच्या नामांतरासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविल्यानंतर केंद्राने धाराशिवच्या नामांतरला तात्काळ हिरवा कंदील दाखविला होता मात्र, “छत्रपती संभाजीनगर’बाबत निर्णय प्रलंबित होता. माजी मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर शेवटच्या मंत्रीमडळ बैठकीत या नावांना मंजूरी दिली होती मात्र नव्या शिंदे-फडणवीस सरकारने त्यांचा निर्णय रद्द करत नव्याने निर्णय घेतला होता.
औरंगाबादचे “छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे “धाराशिव’! राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे कोटी-कोटी आभार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या नेतृत्त्वातील सरकारने करुन दाखविले…!
– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र
उस्मानाबाद आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराचा मुद्दा अनेक वर्षांपासून वादग्रस्त ठरत होता. 1988 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वप्रथम औरंगाबादचे “संभाजीनगर’ नामांतर करण्याची घोषणा केली होती. 1995 ला औरंगाबाद महापालिकेने हा ठराव घेतला होता. तत्कालीन मंत्रिमंडळाने अधिसूचनाही काढली होती. मात्र हे प्रकरण कोर्टात पोहोचले आणि नामांतरा विरोधात निकाल लागला. दरम्यानच्या कालावधीत युती सरकार गेल्याने हा मुद्दा लांबणीवर पडला.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/will-make-domestic-and-international-markets-available-to-farmers-prime-minister-modi/
जलील यांचा विरोध
औरंगाबाद हे ऐतिहासिक शहर असून या जिल्हाच्या नामांतरावर जनतेचीही सहमती नाही, असे मत “एमआयएम’चे खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले होते. शहराचे नाव औरंगाबाद ठेवायचे की संभाजीनगर, यावर तेथील लोकांचे मतदान घ्यावे, अशी मागणीही काही दिवसांपूर्वी जलील यांनी केली होती.





