छत्रपती संभाजीनगरमधील शेंद्रा एमआयडीसीत बॉयलर कोसळल्याने 4 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गहू साठवणूक करणारे बॉयलर कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे. या दुर्घटनेत 4 कामगारांचा मृत्यू झाला आहे तर अनेक कामगार गंभीर जखमी झाले आहेत. संभाजीनगरच्या शेंद्रा एमआयडीसीमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
संभाजीनगरच्या शेंद्रा एमआयडीसीत बॉयलर कोसळल्याने अपघात झाला आहे. गहू साठवणूक करणारे बॉयलर कोसळल्याने चार कामगार दगावले आहेत. इतर कामगारांना शोधण्याचे शोध कार्य सुरू आहे. हे बॉयलर रेडिको या कंपनीचे असल्याचे समोर आले आहे. दुपारच्या सुमारास ही दुर्दैवी दुर्घटना घडली आहे.घटनेची माहिती पसरल्यानंतर परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली.
अपघातावेळी कारखान्यात किती कामगार होते, अद्याप याचा आकडा समोर आलेला नाही. या अपघातात चार मजूर जागेवर गेले आहेत, तर काही मजूर गंभीररीत्या जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले.





