छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी: अजित पवारांनी घेतले समाधी स्थळाचे दर्शन; स्मारकाबाबात दिली महत्वाची माहिती

Ajit Pawar | आज स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची ३३६ वी पुण्यतिथी असून या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रक येथील संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी दर्शन घेतले. यावेळी अजित पवार यांनी येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य स्माराकाबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
राज्य शासनाने वढू बुद्रुक आणि तुळापूरसाठी शंभूराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकासाठी सुमारे ३९७ कोटी रुपयांचा निधीचा विकास आराखडा यापूर्वीच मंजूर केला आहे. त्यानंतर अजित पवार यांनी अर्थसंकल्पात त्यासाठी २७० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याने या स्मारकाच्या कामाला गती मिळून वेगाने सुरुवात झाली आहे. स्मारकासाठी निधी मंजूर केल्याने स्मारकाच्या कामाला वेगाने सुरुवात झाली आहे.
आम्ही मागेच तुळापूर आणि वढूचं काम हातात घेतलेले आहे आणि अतिशय दर्जेदार अशा प्रकारची कामं सर्व शंभू प्रेमींना अभिमान वाटेल. तसेच इकडे आल्यानंतर त्यांना देखील मनातून प्रेरणा मिळेल अशा पद्धतीचे स्मारक बनवण्याचे काम आम्ही सर्वजण करतो आहोत, असे अजित पवार म्हणाले.
आज स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त वढु बु. येथील महाराजांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेतलं आणि कृतज्ञतापूर्वक अभिवादन केलं. pic.twitter.com/uoJId44PBt
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 29, 2025
आज त्यांनी शंभूराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतल्यानंतर ट्वीट केले आहे. आज स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त वढु बु. येथील महाराजांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेतलं आणि कृतज्ञतापूर्वक अभिवादन केलं, असे ट्वीट त्यांनी केले आहे. येथे स्मारक उभे राहल्यानंतर येथील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व वाढणार आहे. तसेच पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे.





