Chhagan Bhujbal : मंत्री भुजबळांचे नाशिकमध्ये जंगी स्वागत
Updated On:

नाशिक – राज्याचे मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाशिकमध्ये युवक राष्ट्रवादीच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.
छगन भुजबळ यांनी मंत्रीमंडळात सदस्याची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी क्रेनच्या सहाय्याने 60 फूटी पुष्पहार घालत, ढोल ताशांच्या गजरात व भव्य अतिषबाजीने शाल-फेटा देत युवक पदाधिकाऱ्यांसह त्यांचे जंगी स्वागत केले.
स्वागतावेळी राष्ट्रवादी भवन येथे भव्य रांगोळी ही काढण्यात आली होती. भुजबळांनी विकासादृष्टीने नाशिकचा कायापालट केला आहे. त्यांनी केलेल्या विकासाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पद मिळून आगामी कुंभमेळ्यात नाशिकचा विकासात भर घातली जाणार असल्याचे अंबादास खैरे यांनी सांगितले.





