मुंबई : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच सरकारकडून विधिमंडळाच्या विविध समित्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीच्या वतीने वेगवेगळ्या आमदारांना विधिमंडळाच्या विविध समित्यांमध्ये स्थान देण्यात आले आहे. मात्र, माजी मंत्री छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांना एकाही समितीत नेमणूक करण्यात आलेले नाही. अजित पवारांनी वादग्रस्त असलेल्या धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांना लांब ठेवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Dhananjay Munde) दोन दिवसांपूर्वीच विधिमंडळाच्या विविध समित्या जाहीर करण्यात आल्याच्या माहिती आहे. विधिमंडळाच्या विविध समित्यांमध्ये विविध समिती प्रमुख आणि समिती प्रमुख म्हणून विविध आमदारांची वर्णी लागल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीमधील दोन महत्त्वाच्या नेत्यांचा पत्ता कट झाल्याचे दिसत आहे. माजी मंत्री असलेले धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना कुठेच कोणत्याही समिती स्थान दिले गेले नाही. त्यामुळे अजित पवार यांनी जाणीवपूर्वक वादग्रस्त असलेले धनंजय मुंडे यांना समितीत स्थान न देता चार हात लांब ठेवल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Ajit Pawar) महाराष्ट्र विधिमंडळाच्या विविध समित्या आणि प्रमुख अंदाज समितीचे – अर्जुन खोतकर लोकलेखा समिती-विजय वडेट्टीवार सार्वजनिक उपक्रम समिती – राहुल कूल पंचायत राज समिती – संतोष दानवे रोजगार हमी योजना समिती – सुनील शेळके उपविधान समिती प्रतापराव पाटील चिखलीकर अनुसूचित जाती कल्याण समिती-नारायण कुचे अनुसूचित जमाती कल्याण समिती – दौलत दरोडा विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती – सुहास कांदे महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती -मोनिका राजळे इतर मागासवर्ग कल्याण समिती – किसन कथोरे अल्पसंख्यांक कल्याण समिती – मुरजी पटेल मराठी भाषा समिती – आशुतोष काळे विधानसभेच्या समित्या विशेषधिकार समिती – नरेंद्र भोंडेकर विनंती अर्ज समिती – अण्णा बनसोडे आश्वासन समिती – रवी राणा नियम समिती – राहुल नार्वेकर सदस्य अनुपस्थिती समिती – किरण लहामटे अशासकीय विधेयके व ठराव समिती – चंद्रदीप नरके सदस्यांचे वेतन व भत्ते याबाबत संयुक्त समिती -अजित पवार विधान मंडळाच्या माजी सदस्यांच्या निवृत्तीवेतनाबाबत संयुक्त समिती – अजित पवार ग्रंथालय समिती – प्राध्यापक राम शिंदे आमदार निवास व्यवस्था समिती – शिवेंद्रसिंहराजे भोसले आहार व्यवस्था समिती – डॉक्टर बालाजी किनीकर धर्मादाय खाजगी रुग्णालयाची तपासणी करणे समिती – डॉक्टर आशिष जयस्वाल वातावरणीय बदल संदर्भातील संयुक्त समिती – राम शिंदे