“मी दादांबरोबर नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत…” ; नाराजीच्या चर्चांवर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण

Chhagan Bhujbal । लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील महायुतीत धुसफूस सुरु असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार ) नेते छगन भुजबळ नाराज असल्याचेही बोलले जात आहे. त्यांच्या याच नाराजीच्या चर्चांवर खुद्द छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिलंय.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी बोलताना “विधानसभेआधी अथवा नंतर मी कुठेही जाणार नाही. मी दादांबरोबर नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे. कायमच राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहिल”, असे छगन भुजबळ म्हणाले. तसेच “प्रसारमाध्यमांकडे सध्या दाखवण्यासाठी काही नसल्यामुळे भुजबळांच्या बातम्या दाखवल्या जात आहेत, असेही भुजबळ म्हणाले.
मी नाराज नाही, कुणालाही भेटलो नाही Chhagan Bhujbal ।
पुढे बोलताना भुजबळ म्हणाले,”मी नाराज नाही. मी कोणत्याही नेत्याला भेटलो नाही. माझ्या नाराजीच्या चर्चा फक्त माध्यमांनीच सुरु केल्या. मी नाराज असल्याच्या चर्चा साफ खोट्या आहेत. मी नाराज नाही, मी कुणालाही भेटलो नाही. आमच्या विरोधीपक्षातील नेत्याला भेटलेलो नाही. त्यांना कधी भेटणार…मला वेळच नाही, असे छगन भुजबळ म्हणाले. असे म्हणत भुजबळांनी सगळा घटनाक्रमच सांगितला. ते म्हणाले,
* 10 तारखेला षणमुखानंद हॉल येथे कार्यक्रमात होतो.
* 11 तारखेला आमच्या लोकांसोबत होतो.
* 12 तारखेला अजित पवारांच्या घरी बैठकीला होतो.
* 13 तारखेला राज्यसभेचा अर्ज भरण्यासाठी गेलो.
* 14 तारखेला पुण्यात होतो.
* 15 तारखेला मी येवल्यात होतो.
* 16 तारखेला मी मुंबईत होतो.
मला कुणाला भेटायचं असेल तर मी उघडपणे भेटेल, असे भुजबळ म्हणाले. चॅनलला जोपर्यंत नवीन काही भेटत नाही, तोपर्यंत भुजबळ भुजबळ चालेल असेही त्यांनी म्हटले.
राजकारणात नाराज होऊन चालत नाही Chhagan Bhujbal ।
तसेच “मी नाराज नाही. राजकारणात नाराज होऊन चालत नाही. राजकारणात प्रत्येकजण नाराज होतो अन् दुसऱ्या दिवशी कामला लागतो. कमी जागा मिळाल्यामुळे राहुल गांधी नाराज असतील, मोदीसाहेबही नाराज असतील. शरद पवारही नाराज असतील.. देवेंद्र फडणवीसही नाराज असतील.. अजित पवारही बारामतीची जागा का गेली, त्यामुळे नाराज असतील. ज्याप्रमाणे नाराजीनंतर सर्व नेते कामाला लागले, तसेच मीही कामला लागलोय. मी नाराज नाही. किंवा कुणालाही भेटलो नाही,” असे छगन भुजबळ म्हणाले.
हेही वाचा
देवेंद्र फडणवीसच उपमुख्यमंत्री राहणार ; दिल्लीतल्या बैठकीत मोठा निर्णय





